टिकली-टिळा वादानंतर लेन्सकार्टची नवी नियमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी लेन्सकार्टच्या टिकली आणि टिळा पॉलिसीवरून  वाद  उद्भवला होता. त्यामुळे सोशल मीडियावर लेन्सकार्टवर जोरदार टीका झाली. त्यानंतर कंपनीने आता नियमावली बदलली आहे.

सोशल मीडियावर निवेदन पोस्ट करत कंपनीने म्हटलंय की, 2400 हून अधिक स्टोअर्स चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रद्धा, मान्यता यांच्यापासून आम्ही अडवणार नाही. त्या कंपनीच्या बाहेर सोडून या असे आम्ही म्हणणार नाही. कर्मचाऱ्यांना टिकली, टिळा, सिंदूर, मंगळसूत्र, कडे, हिजाब, पगडी, पवित्र धागे हे घालण्याची मुभा आहे. त्यावर आमचा कुठलाही आक्षेप नाही. लेन्सकार्टद्वारे देण्यात आलेल्या टी शर्टवर मुलींनी चांगल्या फिटिंगचा टॉप किंवा ब्लू जीन्स घालावी. पुरुष कर्मचाऱ्यांनी ब्लू जीन्स घालावी.