
गाव-खेडय़ांमध्ये तर गुरं पाण्यावाचून इकडे-तिकडे भटकताना दिसतात. अजय ठापूर नावाच्या तरुणाने गावातील भटक्या गुरांसाठी पाण्याचा हौद स्वच्छ केला. हा हौद चक्क चिखलाने भरला होता. त्यामध्ये प्रचंड कचरा साठला होता. गुरे तिथे पाण्यासाठी येतात. मात्र पाणी न पिताच निघून जातात हे पाहिल्यानवर अजयने मित्रांच्या मदताने हौदामधील चिखल बाहेर काढला, मग हौद स्वच्छ केला आणि त्यामध्ये गुरांसाठी स्वच्छ पाणी भरले. दुसऱया दिवशी गुरं पुन्हा त्याच रस्त्यानं जात होती. या वेळी मात्र गुरं त्या हौदापाशी आली आणि त्यांना स्वच्छ पाणी प्यायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून देशभरातील नेटकरी या तरुणाचं काwतुक करत आहेत. व्हिडीओ @ajay_thakur_0111_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.


























































