
आयटी कंपनीतील महिलांवरील अत्याचार आणि धर्मांतरप्रकरणी चौघांना न्यायालयाने पुन्हा 29 एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.
धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरूख हुसेन शौकत पुरेशी, रझा रफिक मेमन या चौघांना नाशिकरोड कारागृहातून एसआयटीने गुरुवारी ताब्यात घेतले. शुक्रवारी न्यायालयात हजर केले. पुढील सखोल चौकशीसाठी त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

























































