‘मिले सूर मेरा तुम्हारा’ आंतरशालेय समूहगान स्पर्धेत गुंडेचा अ‍ॅकॅडमीची बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन एज्युकेशन सोसायटी ओरायन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या आंतरशालेय समूहगान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दादर हिंदू कॉलनी येथील बी.एन. वैद्य सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत ओशिवरा येथील गुंडेचा एज्युकेशन अॅकॅडमीने पहिला क्रमांक पटकावला. शारदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूलने दुसरा, तर कांदिवली अशोक नगर येथील चिल्ड्रन्स अॅपॅडमीने तिसरा क्रमांक पटकावला.

महाराष्ट्रातील आयसीएसई मान्यताप्राप्त शाळांमधून तीसहून अधिक शाळांनी सहभाग नोंदवत या स्पर्धेला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त करून दिले. पुणे, डोंबिवली, ठाणे आणि मुंबई येथील स्पर्धकांनी सादर केलेल्या सुमधुर आणि दर्जेदार सादरीकरणांनी सभागृह मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे, प्रत्येक गटाने 10 मिनिटांत एक देशभक्तीपर गीत आणि एक लोकगीत सादर करणे बंधनकारक होते.

या स्पर्धेसाठी गायक जनार्दन धात्रक, मयूरी पटवर्धन-कुडाळकर आणि अदिती प्रभुदेसाई यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. सेलिब्रिटी गायिका अर्चना गोरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे काwतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता सुलांखे यांच्या नेतृत्वाखाली 85 हून अधिक शिक्षकांच्या समर्पित टीमने हा भव्य उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडला.