बोलीभाषेची समृद्धी – मल्हार कोळी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

मल्हार कोळी ही महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिह्यांत राहणाऱया एका अनुसूचित जमातीची विशिष्ट बोलीभाषा आहे. ही बोली मराठी भाषेची एक पोटभाषा किंवा उपबोली म्हणून ओळखली जाते. या बोलीवर मराठी भाषेचा सखोल प्रभाव आहे, परंतु त्यात स्थानिक आदिवासी संस्कृती आणि परिसरातील शब्दांचा मिलाफ आढळतो. ठाणे आणि पालघर भागातील लोकसंख्येमुळे, या बोलीमध्ये कोकणी मराठी आणि काही प्रमाणात गुजरातच्या जवळ असल्यामुळे गुजराती शब्दांचाही संमिश्र प्रभाव आहे.

मल्हार कोळी समाज हा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा असल्याने, त्यांच्या बोलीभाषेत शेती, मासेमारी, निसर्ग आणि लोकगीते (उदा. ‘दरवळ’) या विषयांवर आधारित शब्दसंग्रह विपुल आहे.

जरी ती मराठीची पोटभाषा मानली जात असली, तरी तिचे व्याकरण आणि उच्चारणाचे काही स्वतंत्र नियम आहेत. अनेक आदिवासी बोलीभाषांप्रमाणेच, मल्हार कोळी बोलीवरही आधुनिक मराठीचा प्रभाव वाढत आहे, तरीही ग्रामीण भागात तिचे मूळ स्वरूप टिकून आहे. मल्हार कोळी बोलीभाषेत महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडते.

सध्याच्या घडीला मल्हार कोळी भाषा बोलणाऱयांची संख्या 3 लाखांहून अधिक आहे. आदिवासी व भटक्या विमुक्त वर्गातील अशा बोली भाषा दुर्मिळ वर्गात मोडत असून या भाषेत उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी, धोरणात्मक पातळीवर असलेला निरुत्साह, डिजिटल व्यासपीठावर त्यांची अनुपलब्धी यामुळे या भाषा मृत्यूपंथाला लागल्या आहेत.

या बोलीभाषांमध्ये समाज, निसर्ग, देवी-देवता, शरीर अशाबद्दलचे शब्द आहेत. त्यामुळे या भाषांचे अस्तित्व सिद्ध होते. मात्र या भाषांना धोरणात्मक पातळीवर आधार न मिळाल्याने त्यांचे अस्तित्व पुसले जात आहे. यातील काही भाषा शालेय स्तरावर शिकवल्या जातात मात्र इतर भाषांमध्ये शिक्षण नसल्याने या भाषांची स्थिती चिंताजनक आहे. यात मल्हार कोळी भाषेचा अंतर्भाव होतो.

मल्हार कोळी आदिवासी जमातीत लोककथा आणि लोकगीतांचा खजिना आहे. विशेषत सांस्कृतिक कार्यक्रमात ही गाणी गायली जातात. गौरीचा सण हाच त्यांचा महत्त्वाचा सण असतो. यातील हे एक गीत ‘पहिले नमू गणपतीदेव, मागून देव रंगणाला फेर, पहिले गाव गाण्याची वोवी, मागून पुंजू गावाची देवी, पहिले देव रंगणाला फिरे, मागून पुंजू गावचा देव.’ यात मराठीशी भाषिक साधर्म्य fिदसून येते.