सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण अमृतमहोत्सव, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली महापूजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोमनाथ मंदिरात महापूजा, कुंभअभिषेक व ध्वजारोहन केले. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निमानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सोमनाथ अमृतपर्व-२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर हवाई दलाने सोमनाथ मंदिर परिसरात सूर्यकिरण हा एअर शो देखील सादर केला.

अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सोमनाथ मंदिराला फुलांनी सुंदर सजवण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.