
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील प्रतापगड व अन्य तीन किल्ल्यांची सुरक्षा व्यवस्था कंत्राटी रक्षकांच्या हातात सोपवण्यात आली आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या पगारासाठी दोन कोटी 54 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
देशातील मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन मिळाले आहे. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला व तामीळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे. यापैकी राजगड, साल्हेर, प्रतापगड, खांदेरी किल्ला हे किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहेत. या स्मारकांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होत असल्याने या स्मारकांच्या सुरक्षेसाठी तसेच स्मारकावर होणाऱया अनुचित घटनांना प्रतिबंध करण्यासाठी स्मारकावर सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकनप्राप्त प्रतापगड, राजगड, साल्हेर व खांदेरी या चार किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी पंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. या प्रत्येक किल्ल्यावर 19 सुरक्षा रक्षक आणि 1 पर्यवेक्षकाचा समावेश आहेत. असे एपूण 80 सुरक्षा रक्षकांची सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्मारकासाठी 63 लाख 66 हजार 888 असे एपूण दोन कोटी 54 लाख 67 हजार 552 रुपयांच्या खर्चास पर्यटन व सांस्पृतिक कार्य विभागाने मान्यता दिली आहे.

























































