
उत्तराखंडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बद्रीनाथपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कांचनजंगावर हिमकडा रविवारी तुटला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासन या घटनेवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे चमोलीचे पोलीस अधीक्षक सुरजीत सिंग पनवार यांनी सांगितले. हिमकडा तुटल्याचा हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हिमकडा तुटण्यासोबतच मोठे दगडही उसळत खाली कोसळताना दिसत आहेत.
























































