खंबाळपाडा हत्याकांड; आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

घर बांधकामाच्या किरकोळ वादातून खंबाळपाडा परिसरात झालेल्या निर्घृण हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. रोहित शेलार (२६) असे आरोपीचे नाव आहे. खून केल्यानंतर तो फरार होता. अखेर टिळकनगर पोलिसांनी त्याला अटक केली.

डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा गावात प्रताप चौधरी व रोहित शेलार हे शेजारी राहत होते. दोघांमध्ये घर बांधकामाच्या कारणावरून वाद सुरू होता. रोहित शेलार याने केलेल्या घर बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी तक्रार केली होती. याच कारणावरून २६ मे रोजी संध्याकाळी पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी संतापाच्या भरात रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांच्या घरात घुसून धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. यामध्ये चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी रोहित शेलार हा घटनास्थळावरून फरार झाला होता. अखेर पोलिसांनी आरोपी रोहितला अटक केली.