हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबीर   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि शिवसेना नेते, युवसेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाखा क्रमांक 21 च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विभागप्रमुख संतोष राणे व महिला विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख रवींद्र मर्ये आणि शाखा संघटक सिद्धी संसारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 14 जून रोजी सकळी 9.30 ते दुपारी 3 या कालावधीत बंदरपाखाडी गावातील एमपीएससी महापालिका शाळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. संपर्क ः चारकोप विधानसभा कार्यालयप्रमुख धर्मेश वरठे 9167583921, युवा शाखा अधिकारी मनीष केसरकर 8928389442.