Crime news – पालघरमध्ये तरुणीवर कोयत्याने वार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका 27 वर्षीय तरुणीवर विकृत तरुणाने कोयत्याने वार केल्याची घटना गोल्ड सिनेमा परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली.या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्नेहल सावंत (27) ही तरुणी गोल्ड सिनेमा परिसरातील एका इमारतीत भाडय़ाने राहत आहे. ती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने तिच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तिच्या मानेवर व कमरेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी स्नेहल सावंत हिला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला बोईसर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात स्नेहल सावंत हिचा प्रियकर अमोल मुळे याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.