
मायलेकीने केलेल्या सिंघम सिनेमातील ‘साथिया.. बदमाश दिल तो ठग है बडा’ या गाण्यावर केलेला भन्नाट डान्स सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या दोघींनी केलेल्या सुंदर डान्समध्ये त्यांच्या अचूक स्टेप्स आणि
चेहऱयावरील हावभाव पाहून नेटकऱयांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये असलेली ऊर्जा आणि चेहऱयावरच्या मनमोकळय़ा हास्याने या सादरीकरणाला आणखी आकर्षक बनवले. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील sunidhi_manjunath या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड होताच तो वेगाने व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला असून, हजारो जणांनी त्यावर पसंतीची मोहोर उमटवली आहे.





























































