माझा वाढदिवस पर्यावरणपूरकतेने साजरा करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षी 14 जूनला माझा वाढदिवस शुभेच्छांची होर्डिंग्ज शहरभर न लावता लोकोपयोगी उपक्रम राबवून, विशेष म्हणजे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राज्यभर फुलांची, फळांची किंवा टिकतील अशी झाडं 14 जूनला तुमच्या परिसरात लावा. प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी जंगलांच्या तोंडाशी, अगदी शहरांमध्येसुद्धा भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारा. फक्त झाडं लावताना जसं स्थानिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवा तसा तो एक दिवसाचा सोहळा होणार नाही किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकून फक्त लाईक्स कमवले असं करू नका, असेही त्यांनी मनसैनिकांना बजावले आहे.

वृक्षतोड्यांचे राज्य

सध्या राज्यात आणि देशात वृक्षतोड्यांचे राज्य चालू आहे. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी यानिमित्ताने सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.