Ratnagiri News – चिपळूणात शिवसैनिकांनी केले वृक्षारोपण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिपळूणच्या वतीने  गोवळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून ती जगविण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला. केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनालाही तेवढेच महत्त्व असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या दोन्ही कार्यक्रमांना विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव (बाळा) कदम, तालुका समन्वयक राजूशेठ देवळेकर, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहरप्रमुख संजय रेडीज, राजू विखारे, विभागप्रमुख संकेत शिंदे, संतोष मिरगल, मयूर फुटकुरे, नगरसेविका वैशाली कदम, माजी नगरसेवक मनोज शिंदे, बंधू कदम, सतीश शिंदे, आकाश कदम, राहुल गुरव, महेंद्र खापरे, ऋषिकेश हरवंडे, आशिष कदम, साहिल मुजावर यांच्यासह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.