
‘नीट’ (NEET) पेपर लीक प्रकरणातील तीन आरोपींची तुरुंगातच चौकशी करण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची याचिका न्यायालयाने सोमवारी मंजूर केली आहे.
STORY | NEET paper leak: Court allows CBI to quiz 3 accused in jail
A court here on Monday allowed the CBI’s plea to question three accused in jail in the NEET paper leak case. Duty judge Surender Mohit Singh was hearing the agency’s plea to question in judicial custody three… pic.twitter.com/dGGiSmRIQN
— Press Trust of India (@PTI_News) June 15, 2026
न्यायाधीश सुरेंद्र मोहित सिंग यांच्यासमोर सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या याचिकेत मनीषा संजय वाघमारे, धनंजय निवृत्ती लोखंडे आणि शुभम मधुकर खैरनार या न्यायलयीन कोठडीत असलेल्या तीन आरोपींची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती.
सीबीआयने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, “तपासात असे समोर आले आहे की हे तिन्ही आरोपी मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी 3 मे रोजी झालेल्या ‘नीट यूजी २०२६’ (NEET UG 2026) च्या परीक्षेपूर्वी पैशांच्या बदल्यात प्रश्नपत्रिका लीक करणे आणि त्या इतरत्र पोहोचवण्याचे काम केले होते.”


























































