गद्दार तो गद्दार अन् खोटारडाही! 2 वर्षांत कोट्यवधींचा निधी मिळूनही विकासाचे काय दिवे लावलेत बघा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोर तो चोर अन् वर शिरजोर अशी एक म्हण आहे, पण आता ती ‘गद्दार तो गदार अन् बर खोटारडाही’ अशी म्हणावी लागेल! विरोधात असल्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही, मतदारसंघात विकासकामे होत नाहीत, साथा ट्रान्सफार्मर देऊ शकत नाही, अशी कारणे सांगून गद्दारीची झूल पांघरलेले सहाही खासदार चक्क त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांचीच दिशाभूल करत आहेत.

दोन वर्षांत या खासदारांना कोट्यवधींचा निधी मिळाला, परंतु कामाच्या नावाने मात्र ठणठणपाळ! एखादा ग्रामपंचायतचा सदस्यही यापेक्षा चांगले काम करू शकतो, परंतु विकास होत नसल्याची कावकाव करणारे हेच खासदार झारीतले शुक्राचार्य वनले होते। जो निभी मिळाला तोदेखील या गद्दारांनी वापरला नाही.

हे बधा गद्दार खासदारांचे प्रगतीपुस्तक

संजय जाधव, परभणी

एकूण मंजूर निधी – १४.०७ कोटी
खर्च केलेला निधी – ३.३८ कोटी (२५ टक्के)
पूर्ण झालेली कामे – ५६ पैकी २५ (३० टक्के)

संजय देशमुख, वाशीम

एकूण मंजूर निधी – १८.०६ कोटी
खर्च केलेला निधी – १.४२ कोटी (७.६ टक्के)
पूर्ण झालेली कामे – १०६ पैकी ७ (६.२ टक्के)

संजय दिना पाटील

एकूण मंजूर निधी – १४.०७ कोटी
खर्च केलेला निधी – १५ लाख (१.१ टक्के)
पूर्ण झालेली कामे – ४० पैकी ० (० टक्के)

भाऊसाहेब वाघचौरे

एकूण मंजूर निधी – १४.०७ कोटी
खर्च केलेला निधी – ७९ लाख (४.९ टक्के)
पूर्ण झालेली कामे – १३५ पैकी २ (१.५ टक्के)

नागेश पाटील आष्टीकर

एकूण मंजूर निधी – १९ कोटी
खर्च केलेला निधी – ५.०६ कोटी (२६.६ टक्के)
पूर्ण झालेली कामे – ७९ पैकी २८ (२६.२ टक्के)

ओम निंबाळकर, धाराशिव

एकूण मंजूर निधी – १८.०५ कोटी
खर्च केलेला निधी – १.९७ कोटी (१०.७ टक्के)
पूर्ण झालेली कामे – १३० पैकी २१ (१३.९ टक्के)