आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर पेटते फटाके टाकले; झाडे जळाली, बार्शीत भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दिलीप सोपल (राष्ट्रवादी काँग्रेस) बार्शी-एकूण उत्पन्न-९.८५ कोटी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर मध्यरात्री पेटते फटाके टाकण्यात आले. यामुळे परिसरात आगीच्या ज्वाळा भडकून झाडे जळाली आहेत. जिवितहानी टळली असली, तरी बंगल्यात मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे बार्शीत भीतीचे व तणावाचे वातावरण आहे. या घटनेमागे विधान परिषदेचा निकाल आणि राजकीय सुडबुद्धी असल्याची चर्चा आहे.

याप्रकरणी पोलिसांनी नाथा मोहिते, योगेश लोंढे, आशिष शिंदे, कुणाल खंदारे, राज देवकुळे, पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, अंबादास रणझुंजारे या आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विधान परिषद निवडणुकीत माजी आमदार भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विजयी झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते बार्शीत फटाके फोडून जल्लोष करत होते. राऊत यांचे राजकीय विरोधक शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्या आळगाव रोडवरील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एका जमावाने मोठय़ा प्रमाणावर पेटके फटाके टाकण्यास सुरुवात केली. या फटाक्यांमुळे बंगल्यातील झाडांना आग लागल्याने आगीच्या ज्वाळा भडकल्या. बाहेर जमाव आरडाओरड करत असल्याने बंगल्यात आमदार सोपल यांचे बंधू सुधीर सोपल, कर्मचारी गुरुपादप्पा स्वामी हे जागे झाले. यावेळी आंबा, जांभुळ, बांबूच्या झाडांना आग लागल्याचे दिसले. तर काही तरुण आत येऊन पेटते फटाके टाकत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव तपास करीत आहेत.