१२ हजारांवर सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतले लाडक्या बहिणींचे पैसे, १६५ कोटींच्या वसुलीची प्रक्रिया सुरू; राज्य सरकारची लेखी कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठी गडबड झाल्याची लेखी कबुली राज्य शासनाने आज विद्या कवनेत गदल शासनाने आज पुरुषांनी महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभघेतल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. आता १२ हजार ४१५ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतल्याचे स्वतः सरकारने सांगितले आहे. त्यांना सुमारे १६५ कोटी रुपये मिळाले असून ते वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांकडून सातत्याने अनियमिततेचे आरोप केले जात होते. आता सरकारच्या लेखी उत्तराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. गरीब, गरजू महिलांसाठी ही योजना आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. तरीही १२ हजारांवर कर्मचारी त्यात लाभार्थी झाल्याने ही शासनाची फसवणूक असून संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध ४२० चे गुन्हे दाखल केले जावेत अशा मागणीने जोर धरला आहे.

 

मोफत रेशन घेणारे शासकीय कर्मचारी मोकाट अंत्योदय योजनेतून गरीबांना रेशनिंग दुकानावर विनामूल्य धान्य पुरवले जाते. राज्यातील सुमारे दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी हे धान्य घेतल्याचे अधिवेशनातच उघड झाले होते. मात्र अद्याप संबंधितांवर कारवाई झालेली नाही.