ओरॅकलने 21 हजार कर्मचारी काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआयचा फटका अनेक क्षेत्रांना बसत असून आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या ओरॅकलने अवघ्या वर्षभरात 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती समोर आली आहे. एआयचा वापर वाढल्याने कंपनीने या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. कंपनी आता एआयवर फोकस करत आहे.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये आतापर्यंत ओरॅकलमधील कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 1.62 लाखांवरून 1.41 लाखांपर्यंत कमी झाली आहे. याचाच अर्थ अवघ्या 12 महिन्यांत 21 हजार कर्मचारी कंपनीतून काढण्यात आले आहेत. या कर्मचारी कपातीमुळे कंपनीला जवळपास 1.8 अब्ज डॉलर्सचा खर्च आला. तरीही कंपनीने महसुलात जोरदार वाढ नोंदवली आहे. एआय आणि क्लाऊड सेवांच्या वाढत्या मागणीचा ओरॅकलला फायदा होत असल्याचे दिसत आहे.