FIFA World Cup 2026 – अमेरिकेने अखेरच्या क्षणी सामना गमावला; तुर्कीएने पिछाडीवरून साकारला थरारक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात यजमान अमेरिकेला पराभव पत्करावा लागला. सामना संपायला काही क्षण बाकी असताना तुर्कीएने गोल लगावत अमेरिकेला मोठा धक्का दिला. या रोमांचक सामन्यात तुर्कीएने अमेरिकेला 3-2 ने हरवून एक मोठा विजय नोंदवला.

अमेरिकेचा तिसऱया मिनिटालाच गोल

सामन्याची सुरुवात आक्रमक झाली. अमेरिकेच्या ऑस्टन ट्रस्टीने तिसऱया मिनिटाला गोल करून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर तुर्कस्तानने एक जोरदार प्रतिहल्ला चढवला. स्टार खेळाडू अर्दा गुलरने दहाव्या मिनिटाला गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर 31 व्या मिनिटाला बरीस अल्पर यिलमाझने आणखी एक शानदार गोल करून पहिल्या सत्राच्या अखेरीस तुर्कीएला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

अखेरच्या क्षणी सामना फिरला

दुसऱया सत्राच्या सुरुवातीला अमेरिकेने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि 49 व्या मिनिटाला सेबॅस्टियन बर्हाल्टरने गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघ आघाडीसाठी लढले आणि सामना अनिर्णित राहील असे वाटत होते. पण सामन्याच्या शेवटच्या क्षणी (90 व्या आणि आठव्या मिनिटाला) चित्र पूर्णपणे पालटले.  तुर्कीच्या कान आयहानने अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल करून आपल्या संघाला 3-2 असा संस्मरणीय आणि रोमांचक विजय मिळवून दिला.