
जपानमध्ये आलेल्या दोन शक्तिशाली चक्रीवादळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱयांमुळे निर्माण झालेली पूरस्थिती तसेच भूस्खलनाचा मोठा धोका असल्याने हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तब्बल 10 लाख नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

























































