
कर्मचारी कारणाशिवाय त्यांच्या निधीपैकी 75 टक्के पर्यंत रक्कम काढू शकतील. केंद्र सरकार 2 जुलै 2026 पासून ईपीएफओ 2.01 नवीन प्रणाली लागू करत आहे.
नवीन प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित केली जाईल, ज्यामुळे दावा प्रक्रियेला गती मिळेल आणि कर्मचाऱयांचा त्रास कमी होईल.
लवकरच यूपीआयद्वारे पीएफ निधी काढण्याची सुविधा सुरू होणार आहे. कर्मचारी ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन त्यांची बँक खाती यूपीआयशी जोडून पीएफ काढू शकतील.
या रकमेमध्ये कर्मचारी आणि पंपनी या दोघांचेही योगदान तसेच त्यावर मिळणारे व्याज समाविष्ट असेल. अंदाजे 7 ते 10 दिवसांनी यूपीआय सुविधा सक्रिय केली जाईल.
नवीन प्रणालीमुळे पीएफचे दावे वेगाने मंजूर केले जातील, कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासणार नाही आणि यूपीआयद्वारे पीएफ निधी थेट खात्यात जमा केला जाईल.



























































