
कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज परिसरात गुरुवारी सायंकाळी शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक मधुर म्हात्रे आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेत नगरसेवक मधुर म्हात्रे यांना भाजप कार्यकर्त्यांनी बेदम तुडवले तर म्हात्रे यांचे भाऊ नीलेश म्हात्रे यांच्यावरही धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.





























































