
व्हिएतनाममधील साउथ फु क्वोक बेटाजवळ शनिवारी स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्पीड बोटीचे कॅप्टन गुयेन होंग हाई यांना अटक करण्यात आली आहे. जलमार्ग वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांची चौकशी सुरू आहे.

























































