
बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर आणि कल्ट क्लासिक हॉरर-थ्रिलर चित्रपट तुंबाडच्या दुसऱ्या भागात मोठी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात आता प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याच्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे. तुंबाडचे निर्माते सोहम शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. आलिया सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
सोहम शहा यांनी आलियासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिचे त्याच्या टीममध्ये स्वागत केले आहे. या फोटोत आलियाच्या हातात तुंबाडमधली पिठाची बाहुली दिसत आहे. मात्र यात आलियाची भूमिका नक्की काय असेल यावर मात्र मौन बाळगण्यात आले आहे.
‘तुंबाड २’ या चित्रपटातील काही भाग हा मुंबईत शुटींग करण्यात येणार असून, याकरता मुंबईत एका शहरासारखा दिसणारा ७-८ एकरांचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. ‘तुंबाड २’ चे दिग्दर्शन आदेश प्रसाद यांनी केले असून, अभिनेता-निर्माता सोहम शाह यांनी त्यांच्या ‘सोहम शाह फिल्म्स’ या बॅनरखाली निर्मिती केली आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2027 ला प्रदर्शित होणार आहे.

























































