आता मी हवेत उडणारी बस आणणार, नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मी आगामी काळात अनेक नवीन तंत्रज्ञाने आणणार आहे. याआधी मी रोप वे आणि केबल कार आणली. तसेच पाण्यात उतरणारे विमानही आणले होते. आता मी लवकरच हवेत उडणारी बस आणणार आहे,’ असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुमारे ६३ किलोमीटर लांबीच्या कानपूर-लखनऊ एक्स्प्रेस वेचे उद्घाटन मंगळवारी नितीन गडकरी यांनी केले. या उद्घाटनावेळी गडकरींनी भविष्यातील वाहतूक तंत्रज्ञानाविषयी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, ‘इलेक्ट्रिसिटीवर चालणारी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम तयार करत आहे. ज्यामळे प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या वेगाने पोहोचता येईल की, त्यांना प्रवासाचा वेळही जाणवणार नाही.’