
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या प्रमुख रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम रडतखडत सुरू आहे. मागील कित्येक महिन्यांपासून सुरू असलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ‘तेजस एक्स्प्रेस’सारख्या काही एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवास आणखी 15 दिवस दादर आणि ठाणे स्थानकावर समाप्त केला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार, ट्रेन क्र. 22120 मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसची सेवा 2 ऑगस्टपर्यंत दादर स्थानकावर अंशतः समाप्त केली जाणार आहे. त्याचबरोबर ट्रेन क्र. 12134 मंगळुरू जंक्शन-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेसची सेवा 4 ऑगस्टपर्यंत ठाणे स्थानकावर अंशतः समाप्त केली जाणार आहे.



























































