
‘एक्सपोर्ट-इंपोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स’च्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा शिवसेना भवन येथे पार पडला. लॉजिस्टिक क्षेत्रातील कौशल्यांची तरुणांना बळ देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि फेडरेशन ऑफ फ्रीट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडियाच्या (एफएफएफएआय) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रीट फॉरवर्डर्स (आयआयएफएफ) यांनी संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला.
लॉजिस्टिक्स क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या कार्यक्रमाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी आदित्य ठाकरे यांनी उपक्रमाचे कौतुक करत तरुणांच्या सक्षमीकरणासाठी हे एक परिवर्तनीय पाऊल असल्याचे सांगितले. लॉजिस्टिक्स हे देशाच्या आर्थिक वाढीचे महत्त्वाचे क्षेत्र असून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने व्यावसायिकदृष्टय़ा प्रशिक्षित तरुण सध्याची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तर अनिल देसाई यांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यां विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्यां सर्व संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सोहळ्याला एफएफएफएआयचे अध्यक्ष अमित कामत, माजी अध्यक्ष दुष्यंत मुलानी, सल्लागार शंतनू भडकमकर, अखिल महाराष्ट्र लॉजिस्टिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकर (नाना) हळदणकर, स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रदीप मयेकर, बीसीबीए अध्यक्ष संजीव हराळे, लॉजिस्टिक्स आणि फ्रीट फॉरवार्ंडग क्षेत्रातील मनोहर पटयाने, विनायक अपराज, संजय शिंगोटे, प्रशांत पोपट, केतन देसाई, चैताली मेहता, मिहीर भडकमकर आदी मान्यवर उपस्थित होते.



























































