दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते पाहून त्रास होतोय! जॉनी लिव्हर यांच्याकडून लाठीहल्ल्याचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या शांतताप्रिय आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. हा हल्ला पाहून देशातील लाखो लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दिल्लीतील लाठीहल्ल्यावर अभिनेते जॉनी लिव्हर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत जे घडते आहे ते पाहून मनाला त्रास होत आहे, असे जॉनी लिव्हर यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने किमान विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, आंदोलन करणाऱ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हीच इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच पार्टीने सुरू केलेल्या दिल्लीतील आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसिरुद्दीन शाह, प्रकाश राज यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. गायक दिलजीत दोसांज, दिग्दर्शक अनुराग कश्यप, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांनी लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे.