
आर्थिक वर्ष 2025-2026 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी 31 जुलै 2026 ही डेडलाईन आहे. त्यामुळे आता करदात्यांसाठी केवळ आठ दिवस उरले आहेत. आयटीआर भरणे हे अनेक कामांसाठी फायदेशीर ठरते. देशात राहणाऱ्या ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा सर्व व्यक्तींनी आयटीआर फाईल भरणे आवश्यक आहे.

























































