
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे, असे वृत्त ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. यासोबतच काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईदेखील केली जाणार आहे.
वृत्तानुसार, ही कारवाई एनटीएमध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एका मोठ्या मोहिमेचाच एक भाग आहे. ‘आज तक’ने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या हवल्याने वृत्त दिले आहे की, येत्या काळात एनटीएमध्ये सुधारणा करण्यासाठी आणखी अनेक महत्त्वाची पावले उचलली जातील. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात पेपरफुटी आणि परीक्षांसंबंधी अनियमिततेच्या आरोपांमुळे एनटीए सातत्याने वादात राहिली आहे.
या पार्श्वभूमीवर आता एनटीएची रचना आणि कार्यप्रणालीमध्ये व्यापक बदल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे वृत्तात सांगण्यात आले आहे.
Sources- “National Testing Agency has terminated 47 officials from their service. Legal and criminal actions will also be taken against some of these officials. This is part of a complete overhaul of NTA that has been in controversy over paper leaks.” pic.twitter.com/zz2mcGIqQp
— ANI (@ANI) July 24, 2026




























































