विद्यार्थ्यांना सहानुभूती न दाखवणारे नेते, धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी मात्र ठामपणे उभे, रोहित पवार यांची फडणवीसांवर संतप्त टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सुरू असलेल्या शिक्षणव्यवस्थेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आणि त्यांचे कौतुक केल्याबद्दल रोहित पवार यांनी फडणवीस यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, गेले महिनाभर महिलांसह हजारो युवकांना लाठ्या काठ्या खाल्ल्या, 20-25 दिवसांचं उपोषण करावं लागलं, काहींनी pellet gun चा सामना केला तर कुणी छर्रेच्या गोळ्या खाल्ल्या… आजही अनेक जण दवाखान्यात उपचार घेत आहेत, या सगळ्याबाबत सहानुभूती न दाखवणारे नेते, धर्मेंद्र प्रधान यांच्या पाठीशी मात्र ठामपणे उभे राहत आहेत आणि त्यांचे कौतुक करत आहेत, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिक्षणव्यवस्थेची दुर्दशा करणाऱ्या नेत्याचे कौतुक करणे आणि या अंधभक्तीवर प्रश्न उपस्थित करत, राजीनामा त्यांच्या चुकीमुळे दिलेला नाही तर त्यांनी उपकार केला आहे, हेच आपल्याला सुचवायचे आहे का, असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.