नवउद्योजकांसाठी आज मार्गदर्शन शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीने नवउद्योजक व व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मृणालिनी चव्हाण या उद्योजकांना ‘व्यवसायातील पॅकेजिंगचे महत्त्व आणि व्यवसायाची वृद्धी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबीर निःशुल्क असणार असून सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. वेळ ः 28 जुलै, दुपारी 2 ते 4. स्थळ – साने गुरुजी विद्यालय, भिकोबा पाठारे मार्ग, केटरिंग कॉलेजच्या मागे, शिवाजी पार्क, दादर. संपर्क ः प्रज्ञा पुरंदरे – 9820210424, दीपाली भाटकर – 9833555080.