
ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम दैनंदिन व्यवहारावर होणार आहे. सर्वसमान्यांना दिलासा मिळणार की खिसा रिकामा करावा लागणार, हे उद्या स्पष्ट होईल. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल, रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमात बदल, आयकर रिटर्न (आयटीआर), बँकिंग सेवेचे शुल्क आणि अन्य काही बदल उद्या, 1 ऑगस्टपासून होणार आहेत.
दर महिन्याच्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या घरगुती आणि कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची समीक्षा करणार आहे. तेल कंपन्यांनी 1 जुलैला 19 किलोचा कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 183.50 रुपयांची कपात केली होती. आता तेल कंपन्यांकडून उद्या, 1 तारखेला नव्या किंमती जाहीर केल्या जातील. रेल्वेचं रिझर्व्हेशन काऊंटरवर तत्काळ ट्रेन तिकीट बुक करणाऱया प्रवाशांना आता लांब रांगा लावाव्या लागणार नाहीत. पश्चिम सेंट्रल रेल्वे 1 ऑगस्टपासून टोकन बेस्ड सिस्टम सुरू करणार आहे. अनेक बँका 1 तारखेपासून आपल्या क्रेडिट कार्ड पॉलिसीमध्ये बदल करणार आहे. सेंट्रल नो यूअर कस्टमर (सीकेवायसी) 2.0 चा विस्तार केला जाणार आहे.
इंस्टामार्टच्या सीईओ
इंस्टामार्टने नंदिता सिन्हा यांची 3 ऑगस्टपासून प्रभावी होणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती जाहीर केली. त्या अमितेश झा यांची जागा घेणार आहेत. नंदिता या भारतातील सर्वात यशस्वी ग्राहक इंटरनेट क्षेत्रातील नेतृत्वकर्त्यांपैकी एक आहेत.
‘प्रिन्सिपल पार्टनर
एसबीआय लाईफ इन्शुरन्सने 2026 च्या पॅरा स्पोर्टस् सीझनसाठी पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियासोबत भागीदारी करत ‘प्रिन्सिपल पार्टनर’ बनण्याची घोषणा केली. या भागीदारीद्वारे पॅरा-खेळाडूंसाठी वचनबद्धता अधोरेखित केली.
जेएलआर इंडिया
जेएलआर इंडियाने पहिल्या तिमाहीत दमदार रिटेल विक्रीची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीत 1665 युनिट्सच्या विक्रीचा विक्रमी आकडा नोंदवला. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ 11 टक्के आहे. घाऊक विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 4 टक्के वाढली.
पैसा बझारचा स्कोअर
60 दशलक्षाहून अधिक ग्राहकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आपला मोफत क्रेडिट स्कोअर तपासला आहे, असे पैसा बझारने जाहीर केले. 2017 मध्ये मोफत क्रेडिट स्कोअर प्लॅटफॉर्म सुरू केल्यापासून, पैसा बझारने प्रत्येकासाठी क्रेडिट माहिती सोपी, सुलभ आणि उपयुक्त केली आहे.
एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसचे अडाप्टिस
एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडियाच्या वतीने आज अडाप्टिस हा त्याचा पेमेंट आणि कॉमर्स उपायांसाठीचा एकीकृत सेवा ब्रँड सुरू केला आहे. या लॉन्चसह एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडियाची पेमेंट स्वीकृती, मर्चंट सोल्युशन्स, व्हॅल्यू-ऍडेड सर्व्हिसेस आणि कॉमर्स क्षमता एकाच ब्रँडखाली आली आहे. यावेळी एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडियाचे होल-टाईम डायरेक्टर आणि सीईओ ताकेओ उएनो, शिनिचिरो निशिकावा, एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी राहुल जैन उपस्थित होते.
अव्होरची पहिली ईव्ही बाईक लाँच
अव्होर इलेक्ट्रिककडून पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ईएक्स लाँच करण्यात आली आहे. ही बाईक ईएक्स 2एस, ईएक्स 2 आणि ईएक्स 1 या तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून या बाईकची सुरुवातीची किंमत 1,24,999 रुपये आहे. 799 रुपयांपासून बुकिंग सुरुवात झाली असून 2 महिन्यांनंतर डिलिव्हरीजना सुरुवात होणार आहे. तिन्ही व्हेरिएंट्समध्ये 250 एनएम पीक व्हील टॉर्क निर्माण करते. ईएक्स 2 एस 114 किमी/तास टॉप स्पीड गाठते, तर ईएक्स 2 आणि ईएक्स 1 या 100 किमी/तास वेग गाठतात. ईएक्स 2एस व ईएक्स 2 या अनुक्रमे 260 किमी आणि 255 किमीची रेंज देतात.
महाराजाची पानडी आणि हिना अगरबत्ती
महाराजा अगरबत्तीची पानडी आणि हिना प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. केसरिया उद, केसरिया चंदन, मिस्टिक रोझस टॅपल ब्लिस, रॉयल उद यांच्यासह विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्त्या महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 8369185071 वर संपर्क साधा.
करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती हरि पानडी आणि विरा मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. माहितीसाठी संपर्क – 9343834805
ऍरोकेम रतलामचा अल्कोहोल फ्री डिओ
ऍरोकेम रतलाम प्रा. लि.ने सेवेन सिज अल्कोहोल फ्री डिओ नवीन पॅकमध्ये बाजारात आणले आहे. या डिओचा सुगंध अत्यंत उत्तेजक, दर्जेदार आणि टवटवीत करणारा आहे. हा डिओ अत्यंत मनमोहक आहे. या डिओच्या 200 मिलीची किंमत 200 रुपये आहे. फॅशन, एचटूओ, ब्लू स्टार, ब्लॅक ऊथ, ऍरो मॅग्नेट हे इतर प्रकारचे उपलब्ध असलेले अल्कोहोल फ्री डिओ बाजारात उपलब्ध आहेत. संपर्क -07412-236226































































