
– पनीर आठवडाभर ताजे आणि मऊ ठेवण्यासाठी, ते पाण्याने भरलेल्या काचेच्या भांडय़ात बुडवून ठेवा. त्यात चिमूटभर मीठ घाला आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. पाणी रोज बदलायला विसरू नका.
– पनीर हलक्या ओल्या सुती कापडात गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवावे, ज्यामुळे त्याचा ओलावा टिपून राहतो. महिनाभर पनीर टिकवण्यासाठी त्याचे तुकडे करून झिप लॉक बॅगमध्ये फ्रीजरमध्ये ठेवावे आणि वापरण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजवावे.





























































