
कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपला समावेश न झाल्याने नाराज झालेल्या इंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यशवंतरायगौडा व्ही. पाटील यांनी सोमवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
पाटील यांनी विधानसभेचे उपसभापती रुद्रप्पा लामाणी यांच्याकडे विधानसौध येथे आपला राजीनामा सादर केला, असे सूत्रांनी सांगितले. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
या घोषणेनंतर यशवंतरायगौडा व्ही. पाटील यांच्या समर्थकांनी येथे आंदोलन करत घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांनी शिवकुमार सोमवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून, त्यामध्ये २० मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज सायंकाळी ५ वाजता लोकभवन येथे होणार आहे.
कर्नाटकात शिवकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 20 नवीन मंत्र्यांचा होणार समावेश



























































