विरार रेल्वे स्थानकात ‘एलिव्हेटेड डेक’ला गती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे स्थानकातील वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या विरार स्थानकातील वाढती प्रवासी संख्या विचारात घेत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने (एमआरव्हीसी) ‘एलिव्हेटेड डेक’च्या कामाला गती दिली आहे. विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत विरार स्थानकावर विविध कामे केली जात आहेत. प्लॅटफॉर्म 3ए आणि 4एची रुंदी 6.5 मीटरवरून 10.5 मीटरपर्यंत आणि लांबी 60 मीटरने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना गर्दीच्या वेळेत मोठा दिलासा मिळाला आहे.
एमआरव्हीसीतर्फे स्थानकाची नवीन इमारत आणि प्लॅटफॉर्म्सवर उभारण्यात येणाऱया तब्बल 8000 चौ.मी. क्षेत्राच्या ‘एलिव्हेटेड डेक’च्या कामाला गती देण्यात आली आहे.