
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचे प्रकरण तसेच गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता याप्रकरणी ५ ऑगस्ट म्हणजेच बुधवारी सुनावणी पार पडणार आहे.
आज न्यायालयात झालेल्या कामकाजादरम्यान, सरन्यायाधीश सूर्य कांत आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्यात चर्चा झाली. मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण उद्या सुनावणीसाठी घेण्याबाबत विचारणा केली असता, कपिल सिब्बल यांनी त्याला होकार देत हे प्रकरण उद्या प्राधान्याने घेण्याची विनंती न्यायालयाला केली. यावर मुख्य न्यायमूर्तींनी आधी मिसलेनियस प्रकरणे घ्यावी लागतील, असे स्पष्ट केले. त्यावर सिब्बल यांनी उद्या थोडा वेळ देण्याची आणि दुपारी २ वाजता हे प्रकरण घेण्याची विनंती केली. दुपारी २ वाजता वेळ दिल्यास सुनावणी होईल, अन्यथा नेहमीप्रमाणे आपल्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच येईल, अशी बाजू सिब्बल यांनी मांडली, असे वृत्त Live Law ने दिले आहे. आता याप्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडेल.
CJI: Should we take it up tomorrow?
Senior Advocate Kapil Sibal: yes we need some time my lord. If it can be taken up on priority tomorrow.
CJI: we will have to see first the miscellaneous matters.
Sibal: Just give us some time tomorrow. 2 PM. So that it is taken up.…
— Live Law (@LiveLawIndia) August 4, 2026



























































