Ratnagiri News – पाच हजार रुपयांची लाच घेताना सावर्डेतील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरेदी केलेल्या जमिनीची सातबारावरील नोंद मंजूर करण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच घेताना सावर्डे येथील मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार यांनी सावर्डे येथे २१८ चौ.मीटर जमिन खरेदी केली होती. जागेच्या सातबारा उतारावर तलाठी यांनी फेरफार करण्यास सांगितले. हा फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अनिल दिलीप जाधव यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दुपारी तीन वाजून 10 मिनिटांनी पाच हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी अनिल जाधव याला रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधीक्षक अविनाश पाटील, निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे, हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर आणि श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे यांनी केली.