
राज्य सरकारच्या योजनांची प्रसिद्धी आता साप्ताहिक महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत दूरचित्रवाणी वाहिन्यांमार्फत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांबरोबरच इतर विविध भाषांमधून रिपोर्जात व बुलेटिनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी 85 कोटी 22 लाख 34 हजार 355 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीसोबतच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय योजना व विविध उपक्रमांची नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रचार, प्रसिद्धी करण्याची योजना आहे. त्यासाठी ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ या योजनेअंतर्गत दूरचित्रवाणीवाहिन्यांद्वारे प्रसिद्धी होणार आहे. साप्ताहिक महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 हा कालावधी राहील.





























































