
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच तिच्या नवनवीन आणि स्टायलिश फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा रॉयल आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तिने सोनेरी रंगाचे मेटॅलिक गोल्ड बस्टियर इंडो-वेस्टर्न कॉर्डसेट परिधान केला आहे. त्याला साजेसा गोल्डन चोकर आणि कानात झुमके घातले आहे. तसेच कपाळावरील छोटी बिंदी आणि न्यूड-मॅट मेकअपने तिच्या या लूकला अधिकच क्लासिक व आकर्षक बनवले आहे. सध्या जान्हवीचा हा बोल्ड आणि एलिगंट इंडो-वेस्टर्न अवतार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



























































