पंढरपुरात संत नामदेव महाराज समाधी सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संत नामदेव महाराज यांच्या ६७७व्या महासंजीवन समाधी सोहळ्यानिमित्त संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदिर, महाद्वार, पंढरपूर येथे सोमवार १० ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता ह.भ.प. रामदास (शिवराज) महाराज जाधव यांच्या पालखी सोहळ्याचे विश्वपुण्यधाम मंदिरात आगमन होणार आहे.

समाधीला अभिवादन करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर महाद्वार येथे स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता श्री संत भक्तशिरोमणी नामदेव महाराज महासंजीवन समाधी सोहळा समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदिराचे अधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी दिली.