
अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने यासंदर्भात निर्णय घेतला. राहुल नवीन यांचा कार्यकाळ १३ ऑगस्ट रोजी संपणार होता. मात्र तो आता १३ ऑगस्ट २०२७पर्यंत राहणार आहे.
राहुल नवीन हे १९९३च्या तुकडीचे महसूल अधिकारी आहेत. ते १४ ऑगस्ट २०२४पासून ईडीचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ वाढविण्याच्या निर्णयात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, त्यांचे सुपरॲन्युएशन अर्थात सामान्य सेवानिवृत्तीची तारीख ३१ जुलै २०२७ आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ या तारखेनंतर सुरू राहणार असून जास्तीत जास्त १३ ऑगस्ट २०२७ पर्यंत कार्यकाळ असेल.



























































