
बुकिंग केल्यानंतर डेव्हलपरने प्रॉपर्टीच्या लेआउटमध्ये मोठे बदल केल्यास, काही प्रकरणांमध्ये घर खरेदीदार परताव्याची मागणी करू शकतात.
तक्रारदाराने विकासकाला दिलेली संपूर्ण रक्कम (कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि सरकारी अधिकाऱयांना दिलेले शुल्क वगळून) व्याजासह परत मिळण्याचा हक्क आहे.
खरेदीदारांनी घर खरेदीपूर्वी RERA अंतर्गत आपले हक्क /प्रकल्पाची सर्व कागदपत्रे समजून घेणे महत्त्वाचे आहे. खरेदीदारांच्या संरक्षणासाठी RERA कायदा 2016 लागू केला गेला.
याअंतर्गत बुकिंगनंतर विकासक प्रकल्पात मनमानीपणे मोठे बदल करू शकत नाही. अशा महत्त्वपूर्ण बदलांसाठी सामान्यतः खरेदीदाराची संमती अनिवार्य आहे.
मालमत्ता जाहिरातीत दाखवल्यापेक्षा वेगळी असेल, विकासकाने केलेले बदल विक्री करार अटींच्या विरोधात असतील तर खरेदीदार कायदेशीर हक्कांचा वापर करू शकतो.






























































