Mirzapur Trailer आता मोठ्या पडद्यावर भौकाल येणार, मिर्झापूर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओटीटीवर सुपरहिट ठरलेल्या मिर्झापूर वेबसिरीजच्या तिनही सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गुड्डू भैय्या, कालीन भैय्या यांच्या अभिनयामुळे गाजलेली ही वेबसिरीज आता चित्रपटाच्या रुपाने मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फजल यांच्यासोबतच रवी किशन यांची देखील एन्ट्री झाली आहे. रवी किशन चित्रपटात बब्बन बबुआ या भूमिकेत असून मिर्झापूरच्या गादीसाठी ते लढताना दिसणार आहेत. त्यांच्यामधले व कालीन भैय्यामधली टशन या चित्रपटातून बघायला मिळणार आहे. या नव्या एन्ट्रीमुळे चित्रपटाला वेबसिरीजपेक्षा वेगळं बनवलं आहे. सोबतच गुड्डू भैय्या आणि प्रिन्स यांच्यातली दुश्मनी पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.