
अकोला जिल्ह्यातील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर व अकोट या विधानसभा मतदारसंघांकरिता मुलाखती मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह, अकोला येथे होणार आहेत.
युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे, तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी उपलब्ध ठेवण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.































































