गुजरातमध्ये 300 महिलांचा ऑनलाइन छळ, एका महिलेसह 8 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांना अश्लील पह्टो, व्हिडीओ आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून 300 महिलांचा छळ केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेने एका महिलेसह 8 जणांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींना गुजरातमधील विविध जिह्यांसह राजस्थानमधून शोधून काढण्यात आले. सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन बुलिंग, अश्लील कंटेंट पाठवणे आणि महिलांना मानसिक त्रास देणे, असे आरोप त्यांच्यावर आहेत.