
शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी दररोज रात्री एकच वेळ पाळा, झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल वा टीव्हीचा स्क्रीन बंद ठेवा, खोलीत अंधार व शांतता ठेवा आणि कॅफिनयुक्त पदार्थ टाळा.
मन व शरीर रिलॅक्स करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या किंवा कोमट पाण्याने पाय धुऊन हलका मसाज करा. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ किंवा शॉवर घेतल्यास लवकर झोप लागण्यासाठी फायदा होतो.
इतर वेळी झोप घेणं टाळा. बेडचा वापर केवळ झोपेसाठीच करा (शिवाय… त्यासाठीही, पण टीव्ही, कॉम्प्युटर किंवा फोनसाठी नव्हे.)



























































