
अमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटने धारावी परिसरात कारवाई केली. जावेद गफार अली आणि महीर तसक अली अशी दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून १ कोटी ७६ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त केले. त्या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला.
तक्रारदार हे कांदिवली युनिटमध्ये काम करतात. फरार आरोपी आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ निरीक्षक राहुल लोखंडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय नाईक, उप निरीक्षक अविनाश दराडे, निखिल शेळके, आदींच्या पथकाने तपास सुरू केला. शुक्रवारी रात्री पोलिसांचे पथक धारावी परिसरात गेले. तेथे दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्या दोघांना थांबण्यास सांगितले. अखेर पोलिसांनी पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ कोटी ७६ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त केले.


























































