भायखळ्यातील महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड्स हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा येथील महापौर निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स लावल्याने रस्ता ब्लॉक झाला होता. बॅरिकेड्समुळे ई. एस. पाटणवाला मार्ग अरुंद झाल्याने वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय झाली होती.

बॅरिकेड्स लावून रस्ता अडवू नये, रस्ता तत्काळ मोकळा करावा, अशी मागणी शिवसेनेने केली होती. शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून बॅरिकेड्स हटवून त्याठिकाणी नो पार्किंगचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी केली होती. शिवसेनेच्या दणक्यानंतर वाहतूक विभागाने हे वादग्रस्त बॅरिकेड्स काढून रस्ता मोकळा केला.